loading
Betty Batt
26 October 2017 1:33:04 AM UTC in Marathi Jokes SMS Shayari and Kavita

Funny Marathi Jokes

सिग्नल तोडून जाणाऱ्या एका गाडीला ट्राफिक पोलिसाने अडवले. गाडीतल्या बाईने काच खाली केली आणि बाहेर डोकावून पहिले.

बाई – अरे बंड्या, कसा आहेस तू? मला ओळ्खल नाहीस? मी तुझ्या शाळेत मराठी शिकवायची...तू माझी पावती फाडणार?

बंड्या – छे ..छे..मॅडम....तुमची पावती कशी फाडीन मी? फक्त हा कागद घ्या आणि शंभरवेळा लिहा – मी कधीही ट्राफिक सिग्नल तोडणार नाही.


नातू – आजोबा, तुमचं आजीवर किती प्रेम आहे! एवढ्या उतारवयात सुद्धा तिला राणी, प्रिये, अप्सरा म्हणतात. कमाल आहे तुमच्या प्रेमाची जे इतके वर्ष टिकून राहिलं.

आजोबा – कमाल प्रेमाची नाही बुद्धीची आहे. मला गेल्या सात वर्षापासून तीच नाव आठवतच नाही..... आणि तिला नाव विचारायची माझी हिम्मत होत नाही......


रमाकाकू रामचंद्र काकांसोबत एका साधूकडे गेल्या.

रमाकाकू – महाराज, आमचे हे सदानकदा घराबाहेर रहातात. काहीतरी कारण शोधून सतत बाहेर जात असतात. घरात असले तरी जोराने टीवी लावून बसतात नाहीतर कानात हेडफोन घालून गाणी ऐकत बसतात. माझ्याशी फार कमी बोलतात. मला भीती वाटते की याचं काहीतरी प्रकरण वगैरे तर सुरु नाही ना....महाराज कृपा करा आणि सुखी संसारासाठी मला एखादे व्रत सांगा.

महाराज – मौनव्रत करून पहा...खूप फरक पडेल.

रामचंद्र काकांनी साधूसमोर लोटांगण घातलं.


राणी (रागाने) – हे काय चालू आहे बंड्या. मी कधी पासून एवढ्या सिरीयस विषयावर बोलते आहे आणि तू मात्र जांभया देत बसला आहेस.

बंड्या – अग, मी जांभया देत नाहीये.......मी मघापासून बोलायचा प्रयत्न करतो आहे .......


काकू – राजा, मी तुझ्यासाठी खूप छान स्थळ आणलं आहे.

मुलगा – मला लग्न नाही करायचं.

काकू – अरे पण मुलगी खूप चांगली आहे. लग्नानंतर तुझ्या सगळ्या अडी-अडचणींमध्ये, सगळ्या दुखाःत ती तुला साथ देईल.

मुलगा – पण काकू मला तर काहीच अडचणी किंवा दुखः नाहीत.

काका – अरे ती लग्नानंतरचं बोलते आहे.


राणी – अरे, बंड्या काय हे? किती पोट सुटलंय तुझ? माझ्या माहेरचे हसत असतात तुझ्यावर....

बंड्या – तू मला का बोलतेस? पोट तर तुझपण वाढलंय.

राणी – माझ पोट तर सुटणारच ना...मी आई होणार आहे.

बंड्या – मग....मी पण तर बाप होणार आहे.


दुःखी पती – हे देवा, या मुली लग्नाआधी इतक्या प्रेमळ आणि चांगल्या असतात, मग लग्नानंतर बायको झाल्यावर त्या इतक्या खतरनाक कश्य बनतात?

देव – मी तर मुलींना नेहमी प्रेमळ आणि मनमिळावूच बनवतो आणि मग तुम्ही त्यांना बायका बनवतात.... तुमच्या कर्माची फळं, अजून काय...


शिक्षिका – मक्या, मी शिकवत असताना तू झोपला का होतास?

मक्या – मडम, ही तुमचीच चूक आहे. तुमचा आवाज खूप गोड आहे, ऐकता ऐकता कधी झोप लागली कळलचं नाही.

शिक्षिका – अच्छा, मग बाकीच्या मुलांना झोप का नाही आली?

मक्या – त्याचं तुमच्या शिकवण्याकडे लक्ष नसेल.


मक्या – अरे यार, मला फार वाईट वाटतंय रे. काल मी माझ्या बहिणीची चैन चोरली आणि माझ्या गर्लफ्रेंडला दिली.

पक्या – काय? तू ती चैन तुझ्या गर्लफ्रेंडला दिलीस? मी दोन वर्ष पैसे साठवून घेतली होती ती...

मक्या – म्हणजे? तू...... आणि माझी बहिण..... (थोडा विचार करून) जाऊ दे वाईट नको वाटून घेऊ, मी पण ती तुझ्याच बहिणीला दिली आहे....

 

१०

वर्गात विज्ञानाचा तास चालू होता आणि मक्या नेहमीप्रमाणे मागच्या बाकावर बसून झोपा काढत होता. सरांनी खडूचा अचूक निशाणा साधला तसा मक्या खडबडून जागा झाला.

सर – काय रे, मी शिकवत असताना डुलक्या घेत होतास?

मक्या – नाही सर.

सर – खोट बोलू नकोस. मी तुला डुलक्या घेताना पाहिलंय.

मक्या –नाही सर, डुलक्या नव्हतो घेत, माझं डोक गुरुत्वाकर्षणामुळे सारखं खाली पडत होतं.

 

11.

बंड्या – अग राणी, कुठे होतीस इतका वेळ? पाच तास झाले तू घराबाहेर जाऊन.

राणी – अरे स्टेशनजवळ तो नवीन मॉल उघडलाय ना, तिथे गेले होते शॉपिंगला.

बंड्या – अच्छा, बघू तरी काय काय आणलंस?

राणी – एक लिपस्टिक आणि ३० सेल्फीज....

 

१२

सर – मुलांनो, चला आता ‘मी पंतप्रधान असतो तर ...’ या विषयवर निबंध लिहा.

मक्या सोडून इतर सर्व मुले निबंध लिहू लागतात.

सर – मक्या, तू निबंध का नाही लिहित आहेस?

मक्या – सर मी माझ्या पीएची वाट बघतोय.


१३

बंड्या – राणी, घरातील सगळ्या किमती वस्तू लपवून ठेव लवकर.

राणी – का?

बंड्या – माझे मित्र येत आहेत संध्याकाळी.

राणी – म्हणजे? तुमचे मित्र चोरटे आहेत की काय?

बंड्या – नाही गं, पण ते त्यांनी त्यांचं सामान ओळखलं तर वांदे होतील

.

१४.

सकाळी-सकाळी राणीने बंड्याच्या समोर गरम दुधाचा ग्लास ठेवला. बंड्या पेपर वाचता वाचता दुधाचा एक घोट घेतो आणि किंचाळतो

बंड्या – शी.....हे कसलं दुध आहे, काय टाकलंय ह्यात?

राणी – अरे, घरातलं केशर संपलं होतं म्हणून मी तुमचा विमल पान मसाला टाकला.

बंड्या – काय वेडी-बिडी झालीस का तू? पान मसाला का टाकलास?

राणी – ते अॅडमध्ये सांगतात ना – इसके दाने दाने में है केसर का दम


१६

 शेजारच्या काकू – काय हो, कशी आहे तुमची नवीन सून? काम वगैरे करते ना?

सासूबाई – हो मग, खूप कष्टाळू आहे. रात्री एक-दीड वाजेपर्यंत कामच करत असते. कॅन्डी-क्रश च्या ४३ लेवल पार केल्यात. फेसबुक वर हजारो फ्रेंड्स आहेत, ट्विटर आणि इंस्टाग्राम वर पण हजारो फोलोअर्स आहेत. ३४ ग्रुपची अॅडमीन आहे. मी विचार करतेय कामाला एक बाई लावावी म्हणजे जास्त प्रगती करेल.


१७

बायको – इन्स्पेक्टर साहेब, माझे पती सापडले का? चार दिवस झाले रिपोर्ट करून. तुम्ही तर बोललात की त्यांचे बूट आणि मोजे सापडले आहेत म्हणून

इन्स्पेक्टर – काळजी नका करू, कालच आम्ही ते मोजे आमच्या कुत्र्याला वास घ्यायला दिलेत, तो शुध्दीवर आला की लगेचच शोध मोहीम चालू करू.


१८

राणी – आज माझी तब्येत ठीक नाही, डोकं भयंकर दुखतंय.

बंड्या – अरेरे, माझा विचार होता की तुला आज बाहेर जेवायला घेऊन जाईन पण आता...

राणी – अरे मी तर मस्करी करत होते, मी एकदम ठीक आहे.

बंड्या – हो? मी पण मस्करी करत होतो. जा आता जेवण बनव जा.


१९.

गुरुजी – मक्या तुला शाळेत यायला एवढा उशीर का झाला?

मक्या – गुरुजी, मी येत असताना एक माणूस रस्त्यावर पडलेली त्याची दोन हजाराची नोट शोधत होता?

गुरुजी – अच्छा, तर तू त्याला पैसे शोधायला मदत करत होतास का?

मक्या – नाही, मी त्या नोटेवर पाय ठेवून उभा होतो.


२०.

रमाकाकू रामचंद्र काकांना घेऊन एक साधूकडे गेल्या.

रमाकाकू – महाराज, सुखी संसारासाठी आजपर्यंत मी खूप व्रते केली, आता एखादे असे व्रत द्या जे यांना करावे लागेल.

साधू ( रामचंद्र काकांना) – मी तुम्हाला काही मंत्र लिहून देतो. दररोज एक मंत्र जोराने बोलत जा.

रामचंद्र काकांनी साधू महारांनी दिलेली मंत्राची चिठ्ठी उघडून पहिली आणि महारांच्या चरणावर लोटांगण घातले.

चिठ्ठीत लिहिले होते – किती सुंदर दिसते आहेस आज तू, एखाद्या अप्सरेसारखी.

                            किती बारीक झाली आहेस तू, जरा स्वतःची पण काळजी घेत जा.

                            किती काम करतेस तू, तुझ्याशिवाय आमचं काहीच करू शकत नाही.

                            तुझ्या हातचे जेवण तर माझ्या आईपेक्षाही जास्त छान आहे.


 २१

पत्नी – जर मी मेले तर तुम्ही काय कराल?

पती – तू जर मेलीस तर मी वेडा  होईन.

पत्नी (भावूक होऊन) – एवढं प्रेम करता माझ्यावर?

पती – नाही गं, एवढं सुख सहन होणार नाही मला..आनंदाने पागल होऊन जाईन मी.


२२

राणी – बंड्या मी माझ्या सगळ्या गोष्टी तुझ्याबरोबर शेअर करते पण तू मात्र तुझ्या सर्व गोष्टी माझ्याबरोबर शेअर नाही करत.

बंड्या – असं काही नाही. जे काही माझं आहे ते सगळ तुझपण आहे. तू बोल मी काय करू म्हणजे तुझा विश्वास बसेल?

राणी – असं, मग तुझ्या लॅपटॉपमध्ये जो ‘माय डॉक्यूमेंट’ म्हणून फोल्डर आहे त्याचं नाव आत्ताच्या आत्ता ‘अवर डॉक्यूमेंट’ कर.


२३

रमाकाकूंनी इंग्लिश स्पिकिंगचा क्लास लावल्यापासून घरात नेहमी इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करीत. एके दिवशी संध्याकाळी रामचंद्र काका ऑफिसवरून थकून-भागून परतले.

रमाकाकू (उत्साहाने) – वेलकम होम, डार्लिंग.

रामचंद्र काका – थँक्यू डीअर, आज मी खूप थकलोय.

रमाकाकू – नो प्रॉब्लेम डार्लिंग, रेस्ट इन पीस.


२४

डॉक्टर (पेशंटशी गप्पा मारता मारता) – तुम्हाला माहिती आहे का, मला लहानपणी डाकू बनायचे होते.

पेशंट (डॉक्टरांचं बिल पाहून) – नशीबवान आहात तुम्ही, सर्वांचीच लहानपणीची स्वप्न पूर्ण होत नाहीत.


२५

मक्या शाळेतून लवकर घरी आला. वडिलांनी त्याला लवकर येण्याचे कारण विचारले.

मक्या – मी शाळेत एक डास मारला म्हणून गुरुजींनी मला शाळेतून हाकलून दिलं.

वडिलांनी शाळेत फोन लावला

वडील – काय चाललंय हे? एक डास मारला म्हणून तुम्ही मक्याला शाळेतून घरी पाठवलं?

गुरुजी – हो, कारण तो डास माझ्या गालावर बसला होता.


२६

गण्या – काय रे बंड्या, आज भलताच खुश दिसतोयस तू. काय झालय तरी काय?

बंड्या – अरे काल एका मानसिकतज्ञाच बोलण ऐकलं. त्याने सांगितलं की रोज बायकोशी बोला, सुखी व्हाल.

गण्या – मग?

बंड्या – मग काय, सकाळपासून चार-पाच बायकांसोबत बोललो. खूप छान वाटतंय आता.  


२७

जीवशास्त्राचा तास चालू असतो.

गुरुजी – मुलांनो आज आपण पक्ष्यांबद्दल शिकलो. तुम्हाला किती समजलं हे पाहण्यासाठी मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. ठीक आहे? मक्या, तू सांग, असा कोणता पक्षी आहे जो उडू शकत नाही?

मक्या (खूप वेळ विचार करून) – मेलेला पक्षी.


२८

पेशंट – डॉक्टर साहेब, मला दररोज सकाळी ७ वाजता लाघवी होते. काहीतरी करा प्लीज.

डॉक्टर – पण यात समस्या काय आहे?

पेशंट – डॉक्टर माझी झोपमोड होते ना त्यामुळे.


२९

गुरुजी – वीस आंब्यापैकी निम्मे आंबे नासले तर किती आंबे शिल्लक राहतील?

मक्या – वीस.

गुरुजी – वीस? कसे काय?

मक्या – आंबे नासले तरी ते आंबेच राहतील ना? फणस थोडीच होणार आहेत.


३०

बंड्या – आज ट्रेनमध्ये कोणीतरी माझं पाकीट मारलं, पण नशीब माझ्या बायको मुळे माझे पैसे वाचले.

गण्या – वाहिनीने चोराला पकडलं की काय?

बंड्या – नाही रे, तिने सगळे पैसे सकाळीच काढून घेतले.


३१.

गण्याच्या गर्लफ्रेंड पिंकीने सांगितले की आह घरी कोणी नाही म्हणून गण्या रात्री तिच्या घरी गेला आणि घराचा दरवाजा ठोठावला. आतून आवाज आला – कोण आहे?

गण्या (दबक्या आवाजात) – मी आहे.

पिंकी – मी कोण?

गण्या – तू पिंकी, अजून कोण.


३२.

एका इंग्लिश स्पिकिंगच्या क्लासच्या बाहेर जाहिरात लावली होती. ‘एका महिन्यात फाडफाड इंग्रजी बोलायला शिका. महिलांना पन्नास टक्के सूट’

गण्या (क्लासच्या मालकाला) – काय हो? महिलांना पन्नास टक्के सूट का? आजकाल समानतेचा जमाना आहे आणि तुम्ही हा भेदभाव का करता?

मालक – अहो, महिलांना फाडफाड बोलायला पहिल्यापासूनच येत असते आम्ही फक्त त्यांना इंग्लिश बोलायला शिकवतो, म्हणून पन्नास टक्के सूट.


३३.

रमाकाकूंनी इंग्लिश शिकण्याचा क्लास लावला होता आणि ते इंग्लिश पुस्तक घेऊन बसल्या होत्या. अचानक त्यांना एक शंका आली.

रमाकाकू – काय ओ, कम्प्लीट आणि फिनिश मध्ये काय फरक असतो.

रामचंद्र काका – लग्न योग्य मुलीशी झालं तर लाईफ कम्प्लीट आणि नाही झालं तर लाईफ फिनिश.


34

श्रोता – काय कवी महाशय, आज-काल तुम्ही प्रेमगीते वगैरे लिहित नाही? बरेच दिवस तुमची कविता ऐकली नाही.

कवी – ज्या मुलीवर कविता लिहायचो तीच लग्न झालं त्यामुळे आता कविता लिहिणं सोडून दिलं आहे.

श्रोता – मग तिच्या आठवणीत विरह गीते का नाही लिहित?

कवी – कारण तीच लग्न माझ्याशीच झालं आहे.

असं सांगून कवी महाशय भाजीपाल्याच्या पिशव्या घेऊन घरी निघाले.


३५

गण्या घरच्यांसोबत मुलगी पाहायला गेला. वरवरची बोलणी झाल्यावर भावी सासऱ्याने प्रश्न विचारला की मुलाला काही व्यसन वगैरे आहे का? आणि गण्याच्या भोळ्या आईने खरे बोलायला सुरवात केली.

आई – त्याला सिगरेटचं व्यसन आहे. दिवसाला कमीत-कमी पाच-सहा सिगरेट तरी पितो आणि रोज रात्री दारू प्यायल्याशिवाय झोप येत नाही. पण घरी मात्र पीत नाही, तो डान्सबार मध्ये जाऊन फक्त विदेशी चांगल्या ब्रांडची दारू पितो.

सासरे – हो? म्हणजे चांगलाच कमवत असणार. आम्हाला मुलगा पसंत आहे.


३६

मक्या – गुरुजी मी दोन दिवस शाळेत येणार नाही, माझी आजी देवाघरी गेली आहे.

गुरुजी – ठीक आहे.

काही आठवड्यानंतर

मक्या – गुरुजी मी दोन दिवस शाळेत येणार नाही, माझे आजोबा देवाघरी गेले आहेत.

गुरुजी – ठीक आहे.

पुन्हा काही आठवड्यानंतर

मक्या – गुरुजी मी दोन दिवस शाळेत येणार नाही, माझी आजी देवाघरी गेली आहे.

गुरुजी (चिडून) – खोटं बोलू नकोस तुझी आजी तर काही महिन्यांपूर्वीच वारली होती ना?

मक्या – हो, पण मग आजोबा एकटे पडले म्हणून त्यांनी पुन्हा लग्न केलं. नंतर आजोबा वारले. मग नवीन आजीने पुन्हा लग्न केलं आता नवीन आजी वारली. मला वाटतंय की नवीन आजोबा पण परत लग्न करतील.


३७

राणी (लाडाने) – ए बंड्या, तुला माझ्यात काय जास्त आवडतं? माझं सौंदर्य की माझे संस्कार?

बंड्या – तुझी ही मस्करी करायची सवय आहे तीच मला जाम आवडते.


३८

जगात दोन गोष्टी करणे खूप कठीण आहे –

पहिली म्हणजे स्वतःचे विचार दुसऱ्यांच्या गळी उतरवणं

दुसरी म्हणजे दुसऱ्यांच्या खिशातले पैसे स्वतःच्या खिशात उतरवणं

पहिले कार्य सफलतापूर्वक करतो तो ‘शिक्षक’   

दुसरे कार्य सफलतापूर्वक करतो तो ‘व्यापारी’  

दोन्ही कार्य सफलतापूर्वक करणारी असते ‘बायको’


३९

गुरुजी – मक्या जगातील काही देशांची नावे सांग पाहू?

मक्या – गुरुजी काहीही विचारता तुम्ही. जगात फक्त एकच देश आहे. तो म्हणजे ‘भारत’.

गुरुजी – मग अमेरिका, चीन, जपान हे काय आहे?

मक्या – गुरुजी ते तर विदेश आहेत.


४० 

राणी – बंड्या मी उद्या माहेरी जाते आहे पण माझी एक अट आहे.

बंड्या (आनंद लपवत) – कोणती?

राणी – तू जर मला सोडायला येणार असशील तरच मी माहेरी जाणार.

बंड्या – चालेलं ना. आणि मी घ्यायला आलो तरच परत ये.


४१

बंड्या आणि राणी एकदा बागेत हातात हात घालून फिरत होते. एक द्वाड मुलगा बंड्याला बोलला – कालची जास्त सुंदर होती. चार दिवस झाले बंड्या रात्रीचा मित्राकडे झोपतोय आणि दिवसभर त्या मुलाला शोधतोय.


४२.

राणी (लाजत-लाजत) – बंड्या मी तुला किती आवडते?

बंड्या – खूप आवडतेस.

राणी – खूप म्हणजे किती? व्यवस्थित सांग ना.

बंड्या – म्हणजे इतकी आवडतेस की तुझ्यासारख्या अजून दोन-तीन बायका कराव्याश्या वाटतात.


४३.

गण्या – अरे माझी गर्लफ्रेंड मला सोडून गेली तेव्हा मला जग भकास वाटू लागलं, असं वाटत होतं की ही दुनिया सोडून द्यावी, आयुष्य संपवून टाकाव.

बंड्या – मग? कसं सावरलंस स्वतःला?

गण्या – नंतर मला आठवलं की तिच्या मैत्रिणीचा  नंबर पण आहे माझ्याकडे.


४४.

टीचर (पाच वर्षाच्या बबडीला) – बबडे, तुझ्या मम्मीच पूर्ण नाव काय आहे?

बबडी (विचार करून) – आडनाव बहुतेक ‘डार्लिंग’ असेल, कारण पपा नेहमी तिच्या नावापुढे डार्लिंग लावतात.

टीचर – अय्या, किती छान, अच्छा पण तुझ्या मम्मीच पाहिलं नाव काय आहे?

बबडी – मला वाटतं की तिचं नाव ‘सॉरी’ असेल.


४५

मक्या परीक्षा द्यायला जातो आणि पेपर मिळायच्या आधीच त्याला दरदरून घाम फुटतो, तो थरथरायला लागतो. त्याचा फिका पडलेला चेहरा बघून गुरुजी त्याच्या जवळ येतात.

गुरुजी – काय रे मक्या काय झालं? बर वाटत नाहीये का? काही प्रॉब्लेम आहे का? हॉल तिकीट वगैरे विसरलास का घरी?...

मक्या (चिडून) – तुम्ही जरा शांत रहा हो...आज गणिताचा पेपर आहे आणि मी इतिहासाच्या चिठ्ठ्या आणल्यात...आता काय करू ते कळात नाहीये आणि तुम्ही आणखी डोकं खाऊ नका.


 ४६

एक कटू सत्य –

मुलाला टक्कल आहे म्हणून नकार देणाऱ्या ९० टक्के मुलींना १० वर्षानंतर टक्कल पडलेल्या मुलासोबतच संसार करावा लागतो.

मुलगी जाडी आहे म्हणून नकार देणाऱ्या ९० टक्के मुलांना २ वर्षानंतर जाड्या मुलीशीच संसार करावा लागतो.


४७

कोल्हापुरातील एक पहेलवान रस्त्यावर आपल्या शक्तीचं प्रदर्शन करत होता. बऱ्याच विटा तोडून आणि काही सळ्या वाकवल्यानंतर त्याने हातात एक मोसंबी घेतली आणि एका हाताने ती पिळून त्याच्यातून भरपूर रस काढला. सर्वजण हे पाहून टाळ्या वाजवू लागले. त्याला अधिकच चेव चढला आणि त्याने सर्वांना आवाहन केले की जो कोणी या मोसंबीतून अजून रस काढून दाखवेल त्याला मी दहा हजार रुपये बक्षीस देईन. गर्दीतून एक बारीक चणीचा वृद्ध बाहेर आला आणि आव्हान स्वीकारले. त्याने ती मोसंबी हातात धरून पिळली आणि अजून रस काढला. पहेलवान चकित झाला आणि विचारले – हे कसं शक्य आहे? तू आहेस तरी कोण?

वृद्ध – इन्कम टॅक्स अधिकारी


४८

‘सैराट’ बघून घरी आलेल्या बंड्याला घराबाहेर असतानाच मेव्हण्याचा आवाज येतो. त्याच्या बरोबर अजून दोन-तीन जण असतात जे विचारात असतात ‘भावोजी कुठे आहेत? आले नाहीत अजून?’

बंड्याचा थरकाप उडतो आणि तो जोरजोरात पळू लागतो. एक-दोन मैल पळाल्यावर तो थांबतो आणि त्याच्या मनात विचार येतो – ‘अरे,आपण का पळतोय? आपलं तर अरेंज मॅरेज आहे.’


४९

गण्या (गर्लफ्रेंडला) – उद्या पासून मी तुला बिल्डिंगपर्यंत सोडायला किंवा घ्यायला नाही येणार. तू रिक्षाने येत जा.

गर्लफ्रेंड – का? काय झालं?

गण्या – तुझ्या बिल्डींगमधली पोरं वात्रट आहेत. कुत्रा अंगावर सोडतात आणि म्हणतात ‘प्यार किया तो डरना क्या?’


५०.

डॉक्टर – बेटा तोंड उघड पाहू.

मम्मी – डॉक्टर त्याला मराठी नीट येत नाही इंग्लिशमध्ये सांगा.

डॉक्टर – असं आहे का, ठीक आहे. बेटा ओपन युअर माउथ.

मम्मी – थांबा मी समजावते – बेटा डू आ ...डू आ.....

(बेटा सेमीइंग्लिश मध्ये आहे)


५१.

पक्या – हॅलो?

कस्टमर केअर –  हॅलो, बोला मी तुमची काय सेवा करू शकते?

पक्या – माझ्या म्हशीने चुकून माझा मोबाईल गिळलाय.

कस्टमर केअर – सॉरी, पण आम्ही या बाबतीत काही करू शकत नाही.

पक्या – तुम्ही काही नका करू फक्त एवढंच सांगा की म्हैस फिरत-फिरत गावाबाहेर गेली तर रोमिंग नाही ना लागणार.


५२.

पक्या पुढचे चार दात तुटले म्हणून डेंटीस्टकडे गेला.

डेंटीस्ट – एवढे दात कसे काय तुटले? अपघात वगैरे झाला का तुमचा?

पक्या – काही नाही, बायकोने केलेले लाडू जरा कडक झाले होते.

डेंटीस्ट – मग खाल्लेत कशाला? फेकून द्यायचे.

पक्या – तेच तर केलं होत.


५३.

गर्लफ्रेंड – जानू, लग्नानंतर सुद्धा तू माझ्यावर इतकंच प्रेम करशील ना?

बॉयफ्रेंड – हो, शोना.

गर्लफ्रेंड – आणि आपण रोज असंच फिरायला नेशील ना आणि दर रविवारी पिक्चरला पण नेशील ना?

बॉयफ्रेंड – हो पण तू नवऱ्याची परमिशन घेऊन ये ...नंतर उगाच लफडा नको.


५४.

कंडक्टर (वरिष्ठ अधिकाऱ्याला) – साहेब, मी आणि ड्रायव्हर सारखेच वेळ काम करतो मग त्याला जास्त पगार आणि मला कमी का?

अधिकारी – त्याच काय आहे. काम करता करता तू झोपलास तर कोणाचंच तिकीट निघणार नाही आणि तो झोपला तर सगळ्यांच तिकीट निघेल, म्हणून


५५.

पक्याला एअरटेल कॉलसेंटर मध्ये नोकरी लागली पण पहिल्या कॉलला उत्तर दिल्यावर त्याला कामावरून काढून टाकले. पहिला कॉल असा होता –

कस्टमर – हॅलो

पक्या – हॅलो, बोला मी तुमची काय सेवा करू शकतो?

कस्टमर – सर, मला व्यवस्थित नेटवर्क मिळत नाही आणि नेटचा रेटपण खूप जास्त आहे.

पक्या – मग जिओच कार्ड घे ना, स्वस्त आणि मस्त.


५६.

कीडनॅपर – मी तुझ्या बायकोला कीडनॅप केले आहे. ती जिवंत पाहिजे असेल तर २५ लाख रुपये तैयार ठेव.

सावकार – काय पुरावा आहे तुझ्याकडे?

कीडनॅपर – ठीक आहे मग मी तिची बोटं कापून पाठवतो तुला.

सावकार – बोटांवरून काय कळणार? डोकं पाठव डोकं.


५७

गण्या त्याच्या मित्राच्या घरी गेला. हॉलमध्ये खेळत असलेल्या गोंडस मुलाला पाहून बोलला –

गण्या - पक्या, अगदी तुझ्यासारखा दिसतो हा, तुझ्यावरच गेलाय, तेच डोळे, तेच केस, तीच हनुवटी .......

पक्या – शु.......हळू बोल. शेजारणीचा आहे. इकडे खेळायला आला आहे.


५८

बंड्या आणि राणी एकाच प्लेटमधून पाणीपुरी खात होते. थोड्यावेळाने –

राणी (लाजत) – इश्य, असं काय बघताय माझ्याकडे.

बंड्या – जरा हळूहळू खाशील का? मला खायलाच मिळत नाहीये.


५९.

दोन दारुडे रात्रीचे घरी परत जात असतात. वाटेत त्यांना एक तळे लागते ज्यात चंद्राचे प्रतिबिंब पडलेले असते.

पहिला दारुडा – ए ए, हे बघ ... हे बघ काय?

दुसरा दारुडा – अरे... मी ह्याला बघितंय कुठेतरी......अरे हा....हा चंद्र आहे चंद्र.

 पहिला दारुडा – म्हणजे? आपण चालत चालत चंद्रापर्यंत आलो की काय?


६०.

मक्या – आज पासून मी शाळेत जाणार नाही. शाळेतल्या शिक्षकांना काहीच येत नाही.

आई – का? असं का बोलतोयस?

मक्या – आज मी सर्व शिक्षकांना विचारले सेल म्हणजे काय? बायोलॉजीचे सर बोलले ‘सेल म्हणजे पेशी’,  फिजिक्सचे सर बोलले ‘ सेल म्हणजे बॅटरी’, इकोनोमिक्सच्या मॅडम सांगतात ‘सेल म्हणजे विक्री’, हिस्टरीच्या मॅडम म्हणतात ‘ सेल म्हणजे जेल’ आणि इंग्रजीचे सर बोलले ‘सेल म्हणजे मोबाईल’. आता तूच सांग सगळे शिक्षक एका शब्दाचा वेगवेगळा अर्थ सांगतात.

आई – बरोबर आहे तुझं. काहीच येत नाही त्यांना. एवढंही माहित नाही की सेल म्हणजे सूट.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

(guest)

0

Reply