वकील एकदा कोर्टात असून सुनावणी दरम्यान आपल्या क्लायंट कडून "योगायोग" हा शब्द त्याच्या तोंडून काढून घेत होते.
ते म्हणाले :- सांगा रमेश , समजा तुम्ही तिसऱ्या मजल्यावर उभे आहात आणि खाली पडलात तर याला काय म्हणाल.?
रमेश :- मी त्याला माझे "नशीब" समजेन .....
वकील - (डोक्याला हात लावत) बरे असो आता तुम्ही समजा आठव्या मजल्यावरून खाली पडलात. तर या गोष्टीला तुम्ही काय म्हणाल?
रमेश - सर , मी त्याला माझे भाग्य समजेल .....
वकील :- वैतागून म्हणाला , आता तुम्ही पंधराव्या मजल्यावर आहात, आणि तेथून खाली पडलात तर याला तुम्ही कायम्हणाल.
रमेश :- म्हणाला मी याला "सवय" म्हणतो कारण मी रोज इमारतीत वर चढतो आणि पडतो पण मरत नाही.
वकील आपले डोके अजून खाजवत आहेत..............